जशी आहे बातमी तसीच

एक्सप्रेस न्युज लाईव्ह च्या अधिक बातम्या पाहण्यासाठी आमच्या YouTube वरील EXPRESS NEWS LIVE च्या CHANNEL ला SUBSCRIBE करा आपल्या भागातील बातम्या पाठवा आमच्या ईमेल वर expressnewslive123@gmail.com बातमी वाचण्यासाठी http://livenews143.blogspot.com भेट द्या ... धन्यवाद WELCOME TO MY NEWS BLOG SUBSCRIBE MY YouTube CHANNEL"Express NEWS live"

07 October 2023

आत्महत्यापूर्वी लिहलेल्या पत्रात पोलीस अधिकाऱ्याने कुटुंबाला लिहिले भावनिक पत्र, वरिष्ठावर देखील केले आरोप

आदरणीय सर,

माझा जन्म शालेय कागदपत्रानुसार एक जानेवारी 1976 या दिवशी आहे. मला आठवत नाही माझी आई कधी वारली किंवा कशी वारली. मी एक वर्षाचा असताना कधीतरी तिचे निधन झाले त्यानंतर माझी सखी मावशी माझी सावत्र आई म्हणून मला लाभली. तिने माझा सख्ख्या आई पेक्षाही जास्त प्रेमाने सांभाळ केला. मी नांदेडच्या पीपल्स कॉलेजमध्ये माझे महाविद्यालयीन शिक्षण घेतले.

मी एक डिसेंबर 1998 रोजी पोलीस शिपाई या पदावर गडचिरोली जिल्हा पोलीस दलामध्ये भरती झालो. 9 डिसेंबर 2021 रोजी माझा विवाह वंदना सोबत झाला. छोटे मोठे कौटुंबिक कलह सोडले तर आमच्या मध्ये कुठल्याही विषयावर कुठलाही मतभेद अद्यापपावेतो तरी नाही. आमचा एक सुविध्य आणि सुंदर गोंडस असा एक मुलगा आहे असित..! त्याला माझ्या खूप खूप शुभेच्छा आहेत त्याच्या भवितव्याबद्दल त्यांनी खूप खूप प्रगती करावी माझं नाव त्याने रोशन करावं ही माझी इच्छा आहे.त्यानंतर सन 2002 साली माझ्या वडिलांचे निधन झाल्यानंतर मी उस्मानाबाद जिल्ह्याचे पोलीस आस्थापनेवर बदली करून आलो.गडचिरोली जिल्हा पोलीस दलाच्या आस्थापनेवर असताना मी सन १९९९ ते २००२ या कालावधीत नक्षलवाद विरोधी विशेष अभियान पथक सी सिक्सटी प्राणहिता येथे कर्तव्य बजावले. त्यानंतर उस्मानाबाद जिल्हा स्थापनेवर बदली झाल्यानंतर 2002 ते 2005 या कालावधीत पोलीस मुख्यालय उस्मानाबाद येथे कर्तव्य बजावले. त्यानंतर सन 2005 ते 2011 या कालावधीत पोलीस ठाणे नळदुर्ग येथे गोपनीय शाखेचे कामकाज पाहिले त्यानंतर 2011 ते 2013 या कालावधीत जिल्हा विशेष शाखा उस्मानाबाद येथे कर्तव्य बजावले. त्यानंतर पोलीस उपनिरीक्षक या पदावर खात्याअंतर्गत सरळ सेवा भरतीने आमची नियुक्ती पोलीस उपनिरीक्षक या पदावर झाल्याने दिनांक 15 ऑक्टोबर 2013 रोजी आम्ही महाराष्ट्र राज्य पोलीस अकॅडमी नाशिक येथे प्रशिक्षण कामे रुजू झालो. त्यानंतर प्रशिक्षण पूर्ण झाल्यामुळे आम्हाला पुणे शहर आयुक्तालय येथे परीविक्षाधीन कालावधी पूर्ण करणे कामी नियुक्त करण्यात आले. परीविक्षाधीन कालावधी पूर्ण झाल्यानंतर आमची पोलीस ठाणे शिवाजीनगर पुणे येथे नियमित नियुक्ती करण्यात आली. त्यानंतर बॉम्बशोधक व नाशक पथक पुणे शहर येथे काही दिवस नियुक्ती देण्यात आली. त्यानंतर आम्ही माननीय पोलीस महासंचालक साहेब महाराष्ट्र राज्य मुंबई यांच्याकडे विनंती अर्ज केल्याने माझी बदली सोलापूर शहर आयुक्तालय येथे झाली.सोलापूर शहर आयुक्तालय या ठिकाणी मी शहर वाहतूक शाखा येथे तब्बल पाच वर्ष कर्तव्य बजावले. त्यानंतर सदर बाजार पोलिस स्टेशन सोलापूर शहर येथे तब्बल आठ ते नऊ महिने कर्तव्य बजावले. त्यानंतर माझे सहाय्यक पोलीस निरीक्षक पदाचे प्रमोशन आल्यामुळे माझी बदली नांदेड परिक्षेत्र नांदेड जिल्हा येथे झाली. पोलीस ठाणे देगलूर येथे आम्हाला माननीय प्रमोद शेवाळे सर यांनी संलग्न केले होते. त्यानंतर अकरा महिन्यांनी माननीय पोलीस अधीक्षक श्री श्रीकृष्ण कोकाटे साहेब यांनी माझी बदली पोलीस ठाणे बिलोली येथे केली आहे. जेव्हापासून मी पोलीस ठाणे बिलोली येथे हजर झालो आहे तेव्हापासून माझ्या बाबतीत सर्व गोष्टी वाईट घडत आहेत. मला माहित नाही हे कशामुळे घडत आहे परंतु मला या सर्व गोष्टींची पूर्णपणे जाणीव होत आहे. वेळेवर पोलीस मदत न मिळणे, तपासाला दिलेल्या गुन्ह्यांमध्ये वाढ होणे, कोणत्याही प्रकारचा मदतनीस गुन्ह्याच्या तपासकामी न देणे, जातीय दृष्ट्या संवेदनशील असणारे व मुदतीत दोषारोपपत्र पाठविणे आवश्यक असणारे गुन्हे तपासाला देणे अशा प्रकारच्या गोष्टी माझ्या बाबतीत सातत्याने घडत आहेत. मदत देणे बाजूला राहिले गुन्ह्याच्या तपासात निष्काळजीपणा दिरंगाई आरोपीला मदत होईल असे कार्य केले म्हणून माननीय उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालयाकडून मलाच ज्ञाप किंवा कारणे दाखवा नोटीसा पाठविण्यात येत आहेत.माझी मनस्थिती पूर्णपणे ढासळून गेलेली असून मी मागील सहा महिन्यापासून अक्षरशः नैराश्याच्या गर्तेमध्ये बुडून गेलो आहे. माझ्या २५ वर्षांच्या नोकरीतील एकंदर पार्श्वभूमीवरून कोणाच्याही लक्षात येईल की मी कोणत्याही प्रकारचा भ्रष्टाचारी किंवा निष्काळजीपणा करणारा कामचलाऊ अधिकारी नाही.

मी मागील चार महिन्यांपासून मला गुन्हयांचे तपासकामी मदतनीस मिळावा याकरिता बरेच वेळा माननीय नरुटे साहेब, पोलीस निरीक्षक पोलीस ठाणे बिलोली, तसेच माननीय परीविक्षाधीन पोलीस उपाधीक्षक श्री कसेकर साहेब यांना वेळोवेळी विनंती केली परंतु देतो देतो म्हणून त्यांनी मला कधीही मदतीसाठी कोणालाही दिले नाही. मध्यंतरी माझ्याकडे गुरनं ४४/२०२३ व गुरनं ५०/२०२३ असे तपासाकरिता देण्यात आले होते. या दोन्ही गुणांची सामाजिक दृष्ट्या फार मोठी व्याप्ती होती. त्यादरम्यान सदर गुन्ह्याच्या तपासकामी माननीय वरिष्ठांचे तसेच बिलोली शहरातील नागरिकांचे यातील आरोपींना अटक करणे बाबत मोठ्या प्रमाणावर दडपण आमच्या मनावर होते. त्यातच इतर गुन्ह्यांचा तपास देखील आमच्याकडे देण्यात आलेला होता. अपुरी मदत व इतर गुन्ह्यांचा तपास यामुळे आम्हाला सदर गुन्ह्याच्या तपासात व आरोपी अटक करणे कामी बराच विलंब झाल्याने आपोआपच आमच्याकडे प्रलंबित प्रकरणांची संख्या वाढली. तसेच आमचे मानसिक दडपण वाढले. त्यातच अटक आरोपीकडून जप्त केलेल्या मोबाईल फोनचे तांत्रिक विश्लेषण करणे कामी सदर गुन्हयातील मोबाईल फॉरेन्सिक तपासणी करिता पाठविले असता सदर मोबाईल दोन वेळा किरकोळ त्रुटीवर परत आले. सदर त्रुटींची पूर्तता करून ते मोबाईल परत पाठवले असता नंतर देखील ते विविध कारणास्तव परत पाठविण्यात आले. त्यामुळे सदरचे गुन्हे फॉरेन्सिकच्या त्रुटीवर मोबाईल परत आल्याने प्रलंबित आहेत. दरम्यान फॉरेन्सिकला पाठविण्याकरिता तीन महिन्यांचा कालावधी उलटून गेल्याने त्यांनी माननीय उपविभागीय पोलीस अधिकारी यांचे शिफारशीसह सदरचे मोबाईल परत तपासणीसाठी पाठवणे बाबत तोंडी कळविले आहे.आम्ही कोणत्याही आरोपीला कसलेही प्रकारची मदत होईल याकरिता कोणत्याही प्रकारचे कृत्य केलेले नाही अथवा गुन्ह्याचे तपासात व आमचे कर्तव्यात हयगय व निष्काळजीपणाचे कृत्य केलेले नाही. तरी आम्हाला सदरचे मोबाईल फोन्स फॉरेन्सिकला पाठवण्याकरिता शिफारस मिळण्यास विनंती होती. तसेच दरम्यानचे काळात विविध प्रशिक्षणे, कार्यशाळा, इतर पोलीस स्टेशनचा चार्ज, कायदा व सुव्यवस्था बंदोबस्त, आजारपण आल्याने देखील सदर गुन्ह्याचे तपासाकडे लक्ष देता आलेले नाही सध्या सदर गुन्हयाचा तपास पूर्ण झालेला असून केवळ मोबाईल फोरेन्सिकला पाठविणे बाकी असल्याने सदरचे गुन्हे प्रलंबित आहेत.आपण विनाकारण वरील नमूद गुन्हयामध्ये माझ्यामागे हात धुऊन लागल्याचे मला स्पष्टपणे जाणवत आहे. मदतीला एखादा अंमलदार न देणे हे देखील जाणून-बुजून केल्यासारखे वाटत आहे. एका दिवसात दोन दोन गुन्हे तपासाला देणे हे देखील कितपत योग्य आहे? माझी मानसिकता पूर्णपणे ढासळून गेली असून माझे मनात नैराश्य निर्माण झालेले आहे. त्यामुळे सतत माझ्या मनात आत्महत्येचे विचार येत आहेत. या सर्व गोष्टी मला अगदी असह्य झालेल्या आहेत. त्यामुळे मला क्षमा करावी मी आपल्या अपेक्षा पूर्ण करण्यास असमर्थ आहे. तसेच नमूद गुन्ह्यातील आरोपीने सूडबुद्धीने त्याचे वडिलांकरवी आमचे विरोधात मानवी हक्क आयोगाकडे तक्रार केलेली असताना आम्ही नमूद गुन्हयातील आरोपीस मदत करण्याचा प्रश्नच उद्भवत नाही ही बाब या ठिकाणी मी स्पष्ट करू इच्छितो. माझ्याकडे प्रलंबित असलेल्या प्रकरणांचे एकमेव कारण गुन्हा रजिस्टर नंबर 44/2023 याचे तपासात लागलेला विलंब हेच आहे. आम्ही जाणून बुजून कोणत्याही प्रकरणाचा तपास प्रलंबित ठेवलेला नाही. गुन्हा रजिस्टर नंबर 143/2023 चा तपास देखील मी ईमाने इतबारे करीत होतो. परंतु प्राप्त परिस्थितीनुसार मला सदर गुन्हयाचा तपास निर्धारित वेळेत पूर्ण करता आला नाही. ऐन महत्त्वाचे वेळी माझ्याकडे कुंटूर पोलीस स्टेशनचा चार्ज देण्यात आला. चार्ज देऊन परत येत असताना त्यातच माझा अपघात होऊन माझा उजव्या बाजूचा जबडा फ्रॅक्चर झाला.

मी आतापर्यंत 25 वर्ष शासनाची इमाने इतबारे सेवा बजावलेली असून पोलीस ठाणे बिलोली येथे हजर झाल्यापासून माझ्या बाबतीत अनेक उलट सुलट गोष्टी घडत असल्याचे मला प्रकर्षाने जाणवत आहे. माझे पश्चात माझी पत्नी व माझा मुलगा यांना कुटुंब निवृत्ती वेतन मिळण्यास कोणतीही अडचण येऊ नये ही माझी मायबाप सरकारला हात जोडून विनंती आहे. माझ्या आतापर्यंतच्या प्रवासात ज्यांनी ज्यांनी मला मोलाची साथ दिली त्या सर्वांचा मी ऋणी आहे.

चिमू आणि पिल्लू मला माफ करा मी तुमच्यासाठी काही एक भरीव योगदान देऊ शकलो नाही. अपेक्षा करतो की, माझ्या पश्चात तुम्ही दोघेही जीवाचे रान करून चांगल्या भवितव्यासाठी आटोकाट प्रयत्न कराल. पिल्लूला माझे अनेक शुभ आशीर्वाद व त्याच्या उज्वल भविष्यासाठी लाख लाख शुभेच्छा. चिमू मला माफ कर.


माझ्या सर्व बॅचमेट मित्रांना माझी विनंती आहे की, माझ्या कुटुंबाला कोणतीही प्रशासकीय अडचण येणार नाही यासाठी माझ्या कुटुंबीयांना मदत करावी.आदरणीय हानपुडे-पाटील सर आपण हजर झाले बरोबर मला समक्ष सांगितले होते की लवकरात लवकर यातील मुद्देमाल फॉरेन्सिकला पाठविण्याकरिता माझ्याकडून शिफारस घ्या व सदरचा मुद्देमाल फॉरेन्सिकला पाठवून लवकरात लवकर सदरच्या गुन्ह्याची निर्गती करून टाका तुम्हाला पाहिजे ती मदत मी करतो. आणि आज मी शिफारस मिळणेकामी पत्र पाठविले असता आपण मला विलंबाचा खुलासा मागविला असून त्यासोबतच मी आरोपीला मदत करीत असल्याचा व गुन्ह्याचे तपासात हयगय व निष्काळजीपणा करीत असल्याचा आरोप माझ्यावर ठेवलेला आहे हे कितपत योग्य आहे? हेच कारण आहे की मी मध्यंतरी थोडासा नैराश्यात गेलो होतो. तसेच माझे कामात मन लागत नव्हते. साहेब आपण मला एक संधी द्यायला हवी होती. परंतु परिस्थितीला ते मान्य नसावे म्हणून माझ्याकडील पेंडिंग होण्याची संख्या वाढत गेली. चिमू माझ्या पॅंटीच्या डाव्या बाजूच्या पाठीमागील खिशात एक चिठ्ठी आहे.

जय हिंद

धन्यवाद.

कळावे आपलाच
आनंद प्रकाश मळाले

0 comments:

Post a Comment