नांदेड| नांदेडचे जिल्हाधिकारी अरुण डोंगरेंना आता श्री साईबाबाच्या सेवेत पाठविण्यात आले आहे असे आदेश अपर मुख्य सचिव ( सेवा ) सिताराम कुंटे यांनी अरुण डोंगरे यांना पाठविले आहेत . काल दि . 13 फेबुरवारी रोजी परभणीचे जिल्हाधिकारी पी . सिवा संकर यांची नियुक्ती नांदेडला जिल्हाधिकारी पदावर झाल्याचे आदेश जारी करण्यात आले होते . त्या आदेशात नांदेडचे समश्रेणीपद अवनत करून पी . सिवा संकर यांची नांदेडला नियुक्ती झाली आहे . अत्यंत कडकशिस्तीचे आणि रेतीमाफियांचे कर्दनकाळ अशी पी . सिवा संकर यांची ख्याती आहे . ते भारतीय प्रशासनिक सेवेचे अधिकारी आहेत .आज अनेक संकेतस्थळावर व्हायरल झालेल्या अपर मुख्य सचिव ( सेवा ) सिताराम कुंटे यांच्या पत्रात नांदेडचे जिल्हाधिकारी अरुण डोंगरे या भारतीय प्रशासनिक सेवेतील अधिकाऱ्यांना मुख्य कार्यकारी अधिकारी श्री साईबाबा विश्वस्त शिर्डी या पदावर नियुक्ती देण्यात आली आहे . साईबाबा संस्थानचे पुर्वीचे अधिकारी डी . एम . मुगळीकर यांची बदली झाली आहे .नांदेड जिल्ह्यात आपला कार्यकाळ चांगला चालवल्यानंतर कालपासून व्हाटसऍपवर त्यांची बदली रेतीच्या प्रितीने झाली अशी एक चारोळी फिरत आहे . सोबतच पी . सिवा संकर यांच्या नियुक्तीने पालकमंत्री नाराज अशा चर्चा सुरू झाल्या आहेत . प्रशासनिक सेवेत बदल्या ह्या । होणारच असतात . त्यामुळे कोण कोठे 7 गेला आणि कोण कोठे आला यापेक्षा ज्या ठिकाणी नियुक्ती मिळाली त्या । ठिकाणचे काम उत्कृष्ट आणि सुंदर करणे हे सर्वात मोठे ध्येय असावे . अरुण डोंगरे यांची बदली आता श्री साईबाबा संस्थामध्ये झाली असल्याने त्या ठिकाणी सुध्दा भरपूर काही करायला वाव आहे . शिर्डीचे संस्थान आता फक्त भारतातच नव्हे तर जगभर प्रसिध्द झाले आहे . शिर्डीला येणाऱ्या भक्तांच्या श्रध्देला ठेच पोहचणार नाही हे पाहण्याची मुख्य जबाबदारी आता अरुण डोंगरेंना पार पाडायची आहे . एक्सप्रेस न्यूज लाईव्हच्या वतीने सुध्दा जिल्हाधिकारी अरुण डोंगरेंना नवीन जबाबदारीसाठी खूप खूप शुभेच्छा







0 comments:
Post a Comment