जशी आहे बातमी तसीच

एक्सप्रेस न्युज लाईव्ह च्या अधिक बातम्या पाहण्यासाठी आमच्या YouTube वरील EXPRESS NEWS LIVE च्या CHANNEL ला SUBSCRIBE करा आपल्या भागातील बातम्या पाठवा आमच्या ईमेल वर expressnewslive123@gmail.com बातमी वाचण्यासाठी http://livenews143.blogspot.com भेट द्या ... धन्यवाद WELCOME TO MY NEWS BLOG SUBSCRIBE MY YouTube CHANNEL"Express NEWS live"

21 February 2020

एससी, एसटी, ओबीसींचे आरक्षण संपवण्याचा भाजपचा डाव :- प्रणिती शिंदे*

सोलापूर|भाजप हे आरक्षणविरोधी असून संविधानाने दिलेले एससी, एसटी, ओबीसींचे आरक्षण संपवण्याचा भाजप सरकार प्रयत्नात आहे. पण काँग्रेस पक्ष भाजपचा हा कुटील डाव हाणून पाडेल आणि आरक्षणाच्या रक्षणासाठी भाजप सरकारविरोधात तीव्र लढा उभारेल असा इशारा आमदार प्रणिती शिंदे यांनी दिला आहे.

 सोलापूर शहर व जिल्हा काँग्रेसच्या वतीने आमदार प्रणिती शिंदे यांच्या नेतृत्वाखाली शहर अध्यक्ष प्रकाश वाले, माजी आमदार प्रकाश यलगुलवार, माजी महापौर सुशीलाताई आबुटे, अलकाताई राठोड, नलिनीताई चंदेले, नगरसेवक रियाज हुंडेकरी, विनोद भोसले, हाजी तौफीक हत्तुरे, भटक्या विमुक्त प्रदेशचे मछिंद्र भोसले, प्र. सरचिटणीस नितीन शिवशरण, मागासवर्गीय जिल्हा अध्यक्ष गौरव खरात, NK क्षीरसागर, उमेश सूरते, महिला जिल्हा अध्यक्ष शाहीन शेख, भटक्या विमुक्त जिल्हा अध्यक्ष सुरेश राठोड, महिला अध्यक्ष हेमाताई चिंचोळकर, नगरसेविका वैष्णवी करगुळे, परवीन इनामदार, पंढरपुर महिला अध्यक्ष आशा बागल, मागासवर्गीय महिला जिल्हा अध्यक्ष संध्या काळे, शहर महिला अध्यक्ष प्रमिला तुपलवंडे, दक्षिण तालुका अध्यक्ष हरीष पाटील, उ तालुका अध्यक्ष सिद्राम सलवदे, जि. प. सदस्य संजय गायकवाड़, कार्याध्यक्ष अरुण शर्मा, शहर युवक अध्यक्ष अंबादास बाबा करगुळे, सेवादल यंग ब्रिगेड अध्यक्ष सुदीप चाकोते, VJNT शहर अध्यक्ष भारत जाधव, नागेश गंगेकर, VJNT युवक अध्यक्ष युवराज जाधव, यांच्या प्रमुख उपस्थितीत केंद्रातील भाजप सरकारच्या आरक्षण विरोधी धोरण व NRC, CAA कायद्याविरोधात जिल्हाधिकारी कार्यालय सोलापूर येथे धरणे आंदोलन करण्यात केले.

 
यावेळी आमदार प्रणिती शिंदे म्हणाले की, उत्तराखंडमधील भाजप सरकार व केंद्रातील मोदी सरकार यांनी मिळून SC, ST, OBC, VJNT, SBC, दलित मावासवर्गीयांना संविधानाने दिलेला आरक्षणाचा मुलभूत अधिकार काढून घेण्याचा प्रयत्न सुरु केला आहे. SC, ST, OBC, VJNT, SBC, दलित मागासवर्गीयांना नोकरीत आरक्षण देणे ही सरकारची सांविधानिक जबाबदारी नाही असे उत्तराखंड भाजप सरकारने सुप्रीम कोर्टात म्हटले होते. दुर्दैवाने सुप्रिम कोर्टाने हा युक्तीवाद ग्राह्य धरून सरकारी नोकरीत आरक्षण द्यायचे की नाही, हे सरकारवर अवलंबून आहे असे म्हटले. हा प्रकार  आरक्षण संपवण्याच्या दृष्टीने टाकलेले पहिले पाऊल आहे. हे अत्यंत धोकादायक आहे. म्हणून सर्वांना रस्त्यावर उतरावे लागेल दलित, मुस्लिम, मागासवर्गीय, SC, ST, OBC, VJNT, SBC यांच्या विरोधात भाजप ने षड़यंत्र सुरु केले असून याच्या विरुद्ध शेवटच्या श्वासापर्यंत लढायचे आहे. काल परवा जामिया, JNU मध्ये घुसले, उदया सोलापूर विद्यापीठात घुसतील आणि परवा आपल्या घरात घुसतील. या भाजपवाल्यांना वाटते की जात, पात, धर्म करुन NRC, CAA, मंदिर मस्जिद सारखे विषय आणून निवडणुका जिंकता येतील हा त्यांच्या गैरसमज आहे तसे झाले असते तर दिल्लीत भाजपचा नामुष्कीचा पराभव झाला नसता. भारताची संस्कृती ही जात धर्म पंथात विभागले जाणारे नाही अश्या पद्धतीला या प्रकारच्या आंदोलोलनातून विरोध करायला पाहिजे. भारताची संस्कृती ही वसुदैव कुटुंबकम ची आहे. आम्ही सर्वांना स्वीकारतो, हिंदु, मुस्लिम, दलित, नंतर आहोत प्रथम आम्ही सर्वजण भारतीय आहोत. आम्ही या देशाचे नागरिक आहोत आम्हाला अधिकार आहेत हे तुम्ही विसरु नका. आम्ही सगळे या देशाच्या स्वातंत्र्यासाठी लढलो, लढत राहणार, या देशामध्ये एकीकडे मंदिरात आरती, मस्जिद मध्ये सजदा, गुरुद्वारामध्ये पठन, चर्चमध्ये प्रार्थना होतो असा जगात कोणताही देश नाही आपण अनेक वर्ष एकत्र राहतो, सण साजरा करतो हे भाजपवाले आपणास तोड़ू पाहतात पण हे शक्य होणार नाही आज मी आमदार म्हणून नाही तुमची एक बहिण, तुमची एक मुलगी म्हणून रस्त्यावर उतरली आहे असे आमदार प्रणिती शिंदे म्हणाले.

यावेळी भीमप्रेमी प्रतिष्ठान च्या वतीने विजुदा नागमोड़े यांनी या आंदोलनास जाहिर पाठिम्बा जाहिर केला.

यावेळी माजी आमदार प्रकाश यलगुलवार, माजी महापौर सुशीलाताई आबुटे, नगरसेवक रियाज हुंडेकरी, विनोद भोसले, कार्याध्यक्ष अरुण शर्मा, नगरसेविका वैष्णवीताई करगुळे, गौरव खरात, केशव इंगळे, NK क्षीरसागर, मछिंद्र भोसले, शाहीन शेख, संजय गायकवाड़, उमेश सूरते, संध्या काळे, प्रमिला तुपलवंडे, नागनाथ कदम, आश्विनी जाधव, चंद्रकांत सुर्वे, मीरा घटकांबळे, अप्पासाहेब बगले, पांडुरंग चौधरी, आशा बागल,गंगाधर शिंदे, आदिनी आपले विचार व्यक्त केले. सूत्रसंचालन परिवहन सदस्य तिरुपती परकीपंडला, तर आभार शहर अध्यक्ष प्रकाश वाले यांनी व्यक्त केले.

यावेळी मनीष गडदे, सुरेश पाटोळे, लखन गायकवाड़, सायमन गट्टू, हाजिमलंग नदाफ, भोजराज पवार, अंबादास गुत्तिकोंडा, अरुण साठे, हारून शेख, मैनुद्दीन शेख, सुमन जाधव, रजाक कादरी, रियाज नाइकवाडी, अनिल मस्के, अशोक कलशेट्टी, मोतीराम राठोड, समीर कोळी, राजू गायकवाड़, उमाकांत येरवाड़े, आझम सैफन, अनुपम शहा, शिल्पा चांदणे, अरुणा वर्मा, अरविंद भांडेकर, वीणा देवकते, नूर अहमद नालवार, विवेक कन्ना, किरण नंदूरकर, चक्रपाणी गज्जम, परशुराम सतारेवाले, चंद्रकांत कोंडगुळे, हसीब नदाफ, झुलेखा विजापुरे, रविप्रभा लोंढे, राजेश झंपले, लतीफ मल्लाबादकर, करिमूनिस्सा बागवान, कोंडनताई काकड़े, मुस्ताक लालकोट, शोभा बोबे, मुमताज तांबोळी, लता गुंडला, मशाक वळसंगकर, रंजना इरकर, मुमताज शेख, अजय गंगेकर, संजय गायकवाड़, राजाभाऊ सलगर, रतन डोळसे, मुस्कान शेख, मोनिका सरकार, सुभाष वाघमारे, आकाश राठोड, विनोद रनसुरे, तुकाराम देवकुळे, सूर्यकांत शेरखाने, गीता राऊत, श्रीकांत दासरी, अनिल वाघमारे, लक्ष्मी दुपारगुडे, चंद्रकांत टिक्के, सलीमा शेख, यांच्यासह नागरिक, पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

▬▬▬ஜ۩(tp)۩ஜ▬▬▬

0 comments:

Post a Comment