_ _ शिवजयंती सगळीकडे उत्साहात साजरी होत होती तर नियती कु . सिध्दी सुनील कामठे या २० वर्षीय तरूणीशी काही वेगळाच खेळ खेळत होती . तीला हे ठाऊकच नव्हते की तीची ही शेवटची शिवजयंती असेल . सिध्दि एस वाय ची विद्यार्थिनी असून किल्ले हडसर वर सह्याद्रीक्कर्स फाऊंडेशन तर्फे स्वछता अभियान राबवून शिवजयंती साजरी करण्यासाठी आपल्या सोबत असलेल्या ३४ सदस्यांबरोबर चिंचपोकळी मुंबई येथून आली होती . सकाळी ९ वा . किल्ले हडसरच्या खिळ्याच्या वाटेने किल्ले हडसर वर स्वच्छता करत पोहचायचे हा त्यांचा मानस होता . अनेक ट्रेकचा अनुभव असलेली सिध्दी हातात श्री शिवछत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्याचा भगवा घेऊन लिड करत होती . सोबतीला पल्लवी होती . एक एक करत ती पल्लवी सोबत खिळ्याची वाट चढूत होते . खिळ्याची चढाई करून आता ती तटबंदीची भिंत ओलांडणार होती . हातात शिवछत्रपती शिवाजी महाराजांची प्रतीमा असलेला भगवा स्वत : कडे ठेवत प्रतीमेला पुजन करण्यासाठी असलेली पिशवी ती पल्लवीकडे देताच तीचा पाठीमागे अचानक तोल गेला व क्षणात हातात भगवा झेंडा घेऊन ती घरंगळत खाली गेली . क्षणात होत्याचं नव्हतं होतं व सिध्दी वरून ४५० फुट खाली कोसळते . ती वेळ होती सकाळची १० : ३० ची घाबरलेल्या स्थितीत इतर सदस्यांना काय करावे सुचेनासे होते . सोबत असलेल्या रितेशने वनविभाग जुन्नर चे रमेश खरमाळे वनरक्षक व माजी सैनिक यांना तुरंत फोन केला . वनरक्षक रमेश खरमाळे यांनी लगेच अॅबुलन्स घेऊन येतो म्हणून रितेशला सांगत धिर देतात . प्रशांत कबाडी अॅबुलन्सचे मालक यांना फोन करताच ते पण घटनास्थळी जाण्यासाठी लगेच पोहचतात क्षणाचा विलंब न करता खरमाळे वनपाल शशिकांत मडके विनायक साळंके व प्रशांत कबाडी अ बुलन्स घेऊन चौघे अगदी २० मिनीटांत हडसर गाठतात . वनरक्षक खरमाळे व वनपाल मडके यांची नियुक्ती जुन्नर वनपरिक्षेत्राचे वनपरिक्षेत्र अधिकारी अजितजी शिंदे यांनी शिवजयंती निमित्ताने जुन्नर तालुक्यातील किल्ल्यांवर आपात्कालीन काही घटना घडलीच तर मदत करण्यासाठी वनविभागाकडून कर्तव्यावर नेमले होते . खरमाळे व सोबतीला असलेले साथीदार तीव्र उतारावर टनटनींच्या झुडपात अडकलेल्या सिध्दीला बाहेर काढतात व अनेक प्रसंगांना तोंड देत तीला अॅबुलन्सपाशी हडसर येथे पोहचतात . येथे जुन्नर पोलिस स्टेशनची टीम पोहचलेली असते त्यांच्या मदतीने सिध्दीला अंबुलन्समधुन जुन्नर सरकारी रुग्णालयात दाखल करतात . परंतु तोपर्यंत सगळं काही संपलेल असतं सिध्दी जगाचा निरोप घेते तो पण श्री शिवछत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्याचा भगवा हाती घेऊनच सिध्दीच्या वडीलांनी जगाचा पहीलाच निरोप घेतलेला असून आई व छोटी बहिण असा तीचा परीवार आहे . आईच्या मनावर खुप मोठा आघात झाला आहे . मुंबईकर या दु : खद प्रसंगी सिध्दीच्या आईला मदतीचा हात देतील अशी अपेक्षा व्यक्त करतो . श्री शिवछत्रपती शिवाजी महाराजांचा भगवा घेऊन शिवजन्मोत्सवी स्वच्छता अभियान राबवून सिध्दी जगाला संदेश देऊन गेलीय की गडकोट जीवापेक्षा जास्त जपा त्यांना स्वच्छ ठेवा व संवर्धन करा . अशा या माऊलीस त्रिवार मानाचा मुजरा व भावपुर्ण श्रद्धांजली मदतीला धावून आलेली रेस्कु टिम रमेश खरमाळे ( माजी सैनिक खोडद ) वनरक्षक घाटघर , शशिकांत मडके ( वनपाल आपटाळे ) विनायक साळंके ( वडज ) प्रशांत कबाडी अॅबुलन्स मालक , रितेश पानसरे ( घाटघर ) सागर तिडके हडसर ग्रामस्थ व सह्याद्रीक्कर्स फाऊंडेशनचे सदस्य आपण या प्रसंगी मदतीचा हात दिलात येणाऱ्या काळात आपणाकडून अशेच कार्य घडत राहो . व कामठे परीवारास या दु : खातुन सावरण्याचे धाडस परमेश्वर देवो हीच सदिच्छा कृपया विनंती असेल मित्रांनो सह्याद्रीच्या अंगाखांद्यावर बागडताना स्वत : ची काळजी घ्या येथे चुकीला माफी नक्कीच नाही . वनविभाग जुन्नरचे विशेष आभार की आपत्तीसाठी आपण दखल घेतलीत आणि प्रशांतजी कबाडी यांनी तुरंत अॅबुलन्स सेवा उपलब्ध करून दिलीत . सिध्दिस भावपूर्ण श्रद्धांजली
20 February 2020
Home »
» शिवजयंतीदिनी तीने घेतला किल्ले हडसर वर शेवटचा श्वास







0 comments:
Post a Comment