जशी आहे बातमी तसीच

एक्सप्रेस न्युज लाईव्ह च्या अधिक बातम्या पाहण्यासाठी आमच्या YouTube वरील EXPRESS NEWS LIVE च्या CHANNEL ला SUBSCRIBE करा आपल्या भागातील बातम्या पाठवा आमच्या ईमेल वर expressnewslive123@gmail.com बातमी वाचण्यासाठी http://livenews143.blogspot.com भेट द्या ... धन्यवाद WELCOME TO MY NEWS BLOG SUBSCRIBE MY YouTube CHANNEL"Express NEWS live"

26 February 2020

सोनखेड मध्ये पुन्हा एका चिमुकलीवर अत्याचार आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल पीडितेवर उपचार सुरू

 # नांदेड 26फेबु । पुरोगामी महाराष्ट्राच्या प्रतिमेला काळिमा फासणारी पुन्हा एक घटना लोहा तालुक्यातील सोनखेड येथे घडली आहे . एका पाच वर्षीय बालिकेवर अत्याचार करण्यात आला असन या प्रकरणातील अज्ञात आरोपी फरार आहे . आरोपीविरुद्ध पॉस्को कायद्याअंतर्गत सोनखेड पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आला असन आरोपीच्या मुसक्या लवकरच आवळल्या जातील अशी माहिती पोलीस अधीक्षक विजयकुमार मगर यांनी दिली . लोहा तालुक्यातील सोनखेड येथील एका पाच वर्षीय चिमुकलीला अज्ञात व्यक्तीने काहीतरी आमिष दाखवून तिचे आफरण केले सदर मुलगी घरी आली नसल्याने तिच्या नातेवाईकांनी सोनखेड पोलिस ठाण्यात रीतसर तक्रार दिली होती . सोनखेड पोलिसांनी घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन मुलीला शोधून काढण्याचे प्रयत्न केले . चिमुकलीला शोधून काढण्यात पोलिसांना यश आले मात्र तिच्यावर अत्याचार झाल्याचे सांगण्यात आले चिमुकलीचं अपहरण करणारा तो अज्ञात आरोपी कोण याची माहिती पोलीस काढत असून लवकरच आरोपींच्या मुसक्या आवळल्या जातील अशी माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक विजयकुमार मगर यांनी दिली पीडित चिमुकलीवर सध्या नांदेडच्या शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत तिची प्रकृती धोक्याबाहेर असल्याची माहितीही प्राप्त झाली आहे . दरम्यान या प्रकरणातील नराधमाला फाशीची शिक्षा झाली पाहिजे त्याच्या मुसक्या तात्काळ आवळा अशी मागणी विविध सामाजिक संघटनांकडून करण्यात येत आहे .

0 comments:

Post a Comment