नांदेड | जिल्ह्यातील धर्माबाद शहरातील गुरूकुल विद्यालयातील दोन विद्यार्थ्यांचा एका तलावात बुडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना आज दुपारी घडली आहे . या घटनेमुळे सर्वंतर शोककळा पसरली आहे . धर्माबाद येथील गुरुकुल विद्यालयातील नवव्या वर्गात शिकणाऱ्या विध्यार्थ्यांचा तलावात बुडून मृत्यू झाला आहे , सदरील दोन विध्यार्थी गुरुकुल शाळेचे नववी वर्गात असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे . आज दुपारी १२ वाजेच्या सुमारास साईचरण किशन आल्लूरोड व लखन सिद्धपा राचेवाड हे दोघे आपल्या इतर दोन मित्रांसह बाळापूर गावाजवळील तलावात पोहायला गेले होते . दरम्यान लखन आणि सिद्धपा या तलावात पोहायला उतरले असता त्यांचा बुडून मृत्यू झाला आहे . या घटनेची माहिती मिळताच धर्माबाद पोलिस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सोहन माच्छरे यांनी घटनास्थळी भेट देऊन तलावात मुलांचा शोध घेण्यासाठी स्थानिक मच्छीमार आणि पोलीस जमादार स्वामी यांना सांगितले असता दोन तासांच्या शोधानंतर या दोन्ही विध्यार्थ्यांचा मृतदेह सापडला आहे .
18 February 2020
Home »
» गुरुकुल विद्यालयातील दोन विद्यार्थ्यांचा तलावात बुडून मृत्यू







0 comments:
Post a Comment