जशी आहे बातमी तसीच

एक्सप्रेस न्युज लाईव्ह च्या अधिक बातम्या पाहण्यासाठी आमच्या YouTube वरील EXPRESS NEWS LIVE च्या CHANNEL ला SUBSCRIBE करा आपल्या भागातील बातम्या पाठवा आमच्या ईमेल वर expressnewslive123@gmail.com बातमी वाचण्यासाठी http://livenews143.blogspot.com भेट द्या ... धन्यवाद WELCOME TO MY NEWS BLOG SUBSCRIBE MY YouTube CHANNEL"Express NEWS live"

20 February 2020

सनशाईन इंटरनॅशनल स्कूल मध्ये बहुभाषीक पत्रकार संघाच्या वतीने शिवजयंती साजरी

बिलोली|हिंदवी स्वराज्याचे जनक छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती
बिलोली तालुका बहुभाषिक पत्रकार महासंघ तर्फे  आयोजीत शिवजन्मोत्सव साजरा बिलोली तालुक्यातील सनशाइन इंटरनॅशनल स्कूल येथे साजरा करण्यात आले या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी बिलोली नगरीच्या नगराध्यक्षा सौ.मैथीलीताई संतोष कुलकर्णी हे होते तर प्रमुख पाहुणे म्हणुन न.पा.उपाध्यक्ष मारोती पटाईत नायब तहसीलदार डॉ.ओमप्रकाश गौंड,पोलीस निरिक्षक शिवाजी डोईफोडे ,कासराळीचे माजी सरपंच अरविंद लक्ष्मण ठक्करवाड,कासराळीचे तंटामुक्ती अध्यक्ष सुर्यकांत महाजन  माजी नगराध्यक्ष संतोष कुलकर्णी,माजी नगराध्यक्ष विजय कुंचनवार,विद्यमान नगरसेवक अनुप अंकुशकर ,जावेद कुरेशी, बिलोली तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष शिवाजी पाटील पाचपिपळीकर ,कार्ला (खूर्द) च्या महीला सरपंच सौ.अल्का देशमुख या मान्यावरांची  प्रमुख उपस्थिती होती.यावेळी उपस्थित मान्यावरांचे  हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचे पुजन व दिप प्रज्वलन करुण कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली .या शिवजन्मोत्सव सोहळ्यात प्रमुख वक्ते  प्रा.डॉ.सिध्दोधन कांबळे प्रसिद्ध विचारवंत व जामा मजिद चे मौलाना अहमद बेग इनामदार यांनी शिवाजी महाराजांचा इतिहास काय ते आपल्या व्याख्यानातुन स्पष्ठ केले हिंदवी स्वराज्याचे जनक शिवाजी महाराज यांच्या विषयी सखोल असे मार्गदर्शन केले.यावेळी सनशाइन इंटरनॅशनल स्कुल च्या विद्यार्थ्यानी शिवाजी महाराज यांच्या जिवनातील काहीअमूल्य  प्रसंग वेशभुषा परिधान करुन पथनाट्याच्या माध्यमातुन सादर केले छत्रपती शिवाजी महाराजांनी शाहीस्तेखानाचा वध कश्या प्रकारे शिताफीने केला होता ते आदभुत दृश पथनाट्याच्या माध्यमातुन सादर केले यावेळी सनशाइन इंटरनॅशनल स्कुल चे संचालक मेरगु व शाळेतील सर्व शिक्षक वृंद तसेच पत्रकार प्रकाश पोवाडे दादाराव इंगळे,तालुकाअध्यक्ष शेख सुलेमान,संदीप गायकवाड, शेख ईलीयास, सुनिल कदम, मारोती भालेराव,मार्तंड जेठे,सय्यद रियाज आदी पत्रकार उपस्थित होते.शाळेतील विद्यार्थी यांचे पालक देखील या कार्यक्रमाला आपली उपस्थिती दर्शवली.आयोजीत शिवजन्मोत्सव सोहळा साजरा करण्यासाठी मराठवाडा बहुभाषीक पत्रकार महासंघाचे अध्यक्ष शेख फारुख उपाध्यक्ष शेख युनुस संघाचे सचिव सतीश बळवंतकर सदस्य माधव दंतापल्ले,नागोराव कुड़के, हाई पटेल,शेख माजीद तर सनशाइन स्कूलचे संचालक सत्यनारायण मेरगु,मुख्याध्यापिका प्रेमा मेरगु,शिक्षक अनिल तमलुरे, ईमरान देसाई,भारत उषाया, परवीन,टी वसंता, टी विद्या,टी मनीषा,अर्जुन सर,पांचाळ,रुपाली,सविता,सुविधा,रेणुका आदीनी परीक्ष्रम घेतले. यावेळी सूत्रसंचालन समतादुत शेख ईरशाद यांनी केले तर आभार तालुका अध्यक्ष शेख फारुख अहेमद यांनी केले.

0 comments:

Post a Comment