जशी आहे बातमी तसीच

एक्सप्रेस न्युज लाईव्ह च्या अधिक बातम्या पाहण्यासाठी आमच्या YouTube वरील EXPRESS NEWS LIVE च्या CHANNEL ला SUBSCRIBE करा आपल्या भागातील बातम्या पाठवा आमच्या ईमेल वर expressnewslive123@gmail.com बातमी वाचण्यासाठी http://livenews143.blogspot.com भेट द्या ... धन्यवाद WELCOME TO MY NEWS BLOG SUBSCRIBE MY YouTube CHANNEL"Express NEWS live"

05 February 2020

धर्माबाद , बिलोली , हिमायतनगर , नायगाव नगरपरिषद / नगरपंचायतीच्या पोटनिवडणूक

क्षेत्रातील मतदान , मतमोजणी केंद्र परिसरात 144 कलम 
नांदेड |जिल्ह्यातील नगरपरिषद धर्माबाद व बिलोली , नगरपंचायत हिमायतनगर व नायगाव येथील रिक्त सदस्य पदासाठी पोटनिवडणूक 2020 साठी गुरुवार 6 फेब्रुवारी 2020 रोजी मतदान होणार आहे . या मतदान केंद्र व परिसरात तर शुक्रवार 7 फेब्रुवारी 2020 रोजी मतमोजणी केंद्र परिसरात मतमोजणी सुरु झाल्यापासून मतमोजणी संपेपर्यंत फौजदारी प्रक्रिया कलम 144 लागू करण्यात आले आहे .

जिल्हादंडाधिकारी अरुण डोंगरे यांनी फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 चे कलम 144 अन्वये अधिकाराचा वापर करुन निवडणूक कालावधीत जिल्ह्यातील नगरपरिषद धर्माबाद व बिलोली , नगरपंचायत हिमायतनगर , नायगाव येथील रिक्त सदस्य पदासाठी पोटनिवडणूक 2020 ची संपूर्ण प्रक्रिया शांततेत , निर्भय व न्याय वातावरणात पार पाडण्याच्या दृष्टीकोणातून कायदा व सुव्यवथा अबाधित राहण्यासाठी गुरुवार 6 फेब्रुवारी 2020 रोजी ज्या ठिकाणी मतदान होणार आहे त्या ठिकाणापासून 200 मीटर परिसरातील सर्व पक्षकारांचे मंडपे ,सर्व दुकाने , मोबाईल , कॉडलेस फोन , पेजर , वायरलेस सेट , ध्वनीक्षेपके , सर्व प्रकारचे फेरीवाले व इतर इलेक्ट्रॉनिक्स उपकरणे , निवडणुकीच्या कामाव्यतीरिक्त खाजगी वाहन , संबंधीत पक्षाचे चिन्हांचे प्रदर्शन व निवडणूकीच्या कामाव्यतीरिक्त व्यक्तीस प्रवेश करण्यासाठी प्रतिबंध करण्यात आले आहे . हा आदेश जिल्हादंडाधिकारी अरुण डोंगरे यांनी 3 फेब्रुवारी 2020 रोजी निर्गमीत केला आहे .

नगरपरिषद / नगरपंचायत हद्दीत मतदान करण्यासाठी दोन तासाची सवलत जिल्ह्यातील हिमायतनगर प्रभाग 2 , बिलोली प्रभाग 5 - अ , धर्माबाद प्रभाग - 2 व 4 - अ , नायगाव प्रभाग - 1 येथे घेण्यात येणाऱ्या नगरपरिषद / नगरपंचायतीच्या पोट निवडणूकीसाठी त्या - त्या प्रभागातील मतदारांना मतदानाचा हक्क बजावण्यासाठी मतदानाच्या दिवशी गुरुवार 6 फेब्रुवारी 2020 रोजी दोन तासाची सवलत देण्यात येणार आहे , अशी अधिसूचना जिल्हाधिकारी अरुण डोंगरे यांनी निर्गमीत केली.मतदानाच्या दिवशी मतदार मतदानापासून वंचित राहू नये , जर मतदाराकडून मतदानाकरीता दोन तासाची सुट्टी अथवा सवलत प्राप्त न झाल्याने मतदान न झाल्याबाबत तक्रार आल्यास संबंधीत आस्थापना , व्यावसायिकाविरुद्ध कार्यवाही करण्यात येईल याची नोंद घेण्यात यावी , असे अधिसुचनेत जिल्हाधिकारी अरुण डोंगरे यांनी नमूद केले आहे .

0 comments:

Post a Comment