-धनाढ्य शक्ति विरोधात जनशक्तिचा विजय :यशवत गादगे
बिलोलीःप्रतिनिधी (सा.वा) :दि.७ फेब्रुवारी
बिलोली नगर परिषद प्रभाग क्र.५-अ च्या झालेल्या पोटनिवडणुकीत आघाडीचे यशवंत लालजी गादगे हे ५२२ मतांनी विजयी झाले.प्रतिस्पर्धी कॉग्रेस चे उमेदवार लक्ष्मण शंकरराव शट्टीवार यांना 452 मते मिळाली त्यांनी काँग्रेस पक्षाच्या उमेदवाराचे अवघ्या ७० मतांनी पराभुत केले.
नगर परिषद प्रभाग क्र.५-अ हा अनुसूचीत जमाती पुरुषासाठी राखीव आहे २०१७ च्या न.प. सार्वत्रीक निवडणुकीत कॉग्रेस चे उमेदवार लक्ष्मण शंकरराव शट्टीवार हे या प्रभागातुन निवडुण आले त्या वेळेस आघाडी कडुण निवडणुकीसाठी उभे राहीलेले यशवंत लालजी गादगे यांचा फक्त २६ मतांनी पराभव झाला होता.
अनुसूचीत जमातीसाठी राखीव आसलेल्या प्रभागातुन निवडुण आलेले लक्ष्मण शट्टीवार हे जात वैधता प्रमाणपत्र सादर न करु शकल्यामुळे त्याचे सदस्यत्व रद्द करण्यात आले होते.या संदर्भात राज्य निवडणुक आयोगामार्फत पोटनिवडणुकीचा कार्यक्रम जाहीर करण्यात आला होता त्या अनुषंगाने दि.६ फेब्रुवारी रोजी मतदान घेण्यात आले होते.
प्रभागातील एकुण १६३५ मतदारापैकी १०१८ मतदारांनी आपल्या मतदानाचा हक्क बजावला होता त्या पैकी विजयी उमेदवार यशवंत लालजी गादगे यांना ५२२ मते मिळाली प्रतिस्पर्धी कॉग्रेस चे लक्ष्मण शट्टीवार यांना ४५२ मते मिळाली अटितटीच्या निवडणुकीत लक्ष्मण शट्टीवार यांचा ७० मतांनी पराभव झाला आहे. ही लड़ाई काँग्रेस पक्षातरफे प्रतीक्षेची होती.💐
शहरातील आपल्या राजकारणाची प्रतिष्ठा टिकवून ठेवणार्या या पोटनिवडणुकीत यशवंत गादगे यांनी बाजी मारुन आपली राजकीय प्रतिष्टा न.प.मध्ये ठिकवुन ठेवण्यात ते यशस्वी झाले आहेत या विजयाचा जल्लोश ढोल ताशांच्या गजरात फटाक्याची अतिशबाजी गुलाल ऊधळुन विजयी मिरवणु काढुन करण्यात आला.
या पोटनिवडणुकीत निवडणुक निर्णय अधिकारी म्हणुन शरद झाडके तर सहाय्यक निवडणुक निर्णय अधिकारी म्हणुन त्र्यंबक कांबळे एस.एन चव्हाण ना.त.निवडणुक यांनी काम पाहीले







0 comments:
Post a Comment