नरसीफाटा | नायगाव तालुक्यातील जनता हायस्कूल नायगाव येथील 6 विद्याथी , पोस्ट बेसीक आश्राम जुनियर । कॉलेज मरवाळी तांडा येथे 4 विद्याथी तर वि . जा . भ . ज . क . माध्यमिक विद्यालय कुंटूर तांडा येथे 6 विद्यार्थी असे एकुण तिन परीक्षा केंद्रावरील कॉपी बहाद्दरांना आज भरारी पथकातील अधिकाऱ्यांनी रस्टीकेट केले .नायगाव तालुक्यातील सात परीक्षा केंद्रावर एकूण 3528 विद्यार्थी पैकी 3476 विद्यार्थ्यांनी बारावीचे इग्रंजी विषयांची परीक्षा देले . जिल्ह्यात कॉपीमुक्त वातावरणात परीक्षा सुरळीत पार पडावी यासाठी शिक्षण विभागाकडून धडपड केली जात असली तरी , अनेक ठिकाणी परीक्षा केंद्रावर सर्रासपणे कॉप्यांचा सुळसुळाट असल्याचे चित्र आहे . परीक्षा कॉपीमुक्त वातावरणात पार पडावी यासाठी भरारी पथकाद्वारे केंद्रांना भेटी दिल्या जात आहेत . नायगाव तालुक्यातील तिन परिक्षा केंद्रावर पेपर सोडविताना नक्कल करणाऱ्या विद्यार्थ्यांना थेट रस्टीकेट केले असून हा पॅटर्न सर्वच पेपरला राबविण्यात यावे असे सुज्ञ नागरिकांतुन बोलल्या जात आहे .दि . 18 फेब्रुवारी रोजी बारावीचा इग्रंजी विषयाचा पेपर होता . यावेळी वरिष्ठ अधिकाऱ्याचे भरारी पथकाने नायगाव तालुक्यात काही परिक्षा केंद्रावर सकाळी परीक्षा सुरु होण्याआधीच एक तासा पासुन तळ ठोकून बसले तर काही परीक्षा केंद्रास भेट दिली असता , या ठिकाणी विद्यार्थी नक्कला करीत असल्याचे निदर्शनास आले . भरारी पथकातील अधिकाऱ्यांनी जनता हायस्कूल नायगाव येथील 6 विद्याथी , पोस्ट बेसीक आश्राम जुनियर कॉलेज मरवाळी तांडा येथे 4 विद्याथी तर वि . जा . भ . ज . क . माध्यमिक विद्यालय कुंटूर तांडा येथे 6 विद्यार्थी असे एकुण तिन परीक्षा केंद्रावरील कॉपी बहाद्दरांना भरारी पथकातील अधिकाऱ्यांनी रस्टीकेट केले .
19 February 2020
Home »
» नायगाव तालुक्यातील तिन परीक्षा केंद्रावर बारावीचे कॉपीबहाद्दर रस्टीकेट







0 comments:
Post a Comment