जशी आहे बातमी तसीच

एक्सप्रेस न्युज लाईव्ह च्या अधिक बातम्या पाहण्यासाठी आमच्या YouTube वरील EXPRESS NEWS LIVE च्या CHANNEL ला SUBSCRIBE करा आपल्या भागातील बातम्या पाठवा आमच्या ईमेल वर expressnewslive123@gmail.com बातमी वाचण्यासाठी http://livenews143.blogspot.com भेट द्या ... धन्यवाद WELCOME TO MY NEWS BLOG SUBSCRIBE MY YouTube CHANNEL"Express NEWS live"

10 February 2020

जिल्ह्यातील विकास कामांना गती देणार-पालकमंत्री अशोक चव्हाण

नांदेड |जिल्ह्यातील विकास कामांना गती देणार आहे . त्या अनुषंगाने नवीन कामांचे प्रस्ताव द्यावेत तसेच मुदखेडकरांना पिण्याच्या पाण्याची कमतरता भासणार नाही यासाठी पूर्ण प्रयत्न करण्यात येतील , असे प्रतिपादन राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा नांदेड जिल्ह्याचे पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी आज मुदखेड येथे केले .मुदखेड नगरपरिषदेने विकसीत केलेल्या अभ्यासिकेचे उद्घाटन पालकमंत्री श्री . चव्हाण यांच्या हस्ते मुदखेड नगरपरिषद कार्यालयात झाले , त्यावेळी ते बोलत होते . यावेळी मुदखेड नगरपरिषदेचे नगराध्यक्ष मजीब अन्सारी . काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष गोविंदराव शिंदे नागेलीकर , भाऊराव चव्हाण सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन गणपतराव तिडके , जिल्हा परिषदेचे सभापती बाळासाहेब रावणगावकर , सभापती श्री नाईक , उपविभागीय अधिकारी पवन चांडक , तहसीलदार दिनेश झांपले , नायब तहसिलदार तथा नगरपरिषदेचे प्रभारी मुख्याधिकारी संजय नागमवाड आदींची प्रमुख उपस्थिती होती . पालकमंत्री चव्हाण यांनी नगरपरिषदेच्या विकास कामांच्या अनुषंगाने महाराष्ट्र नगरोत्थान अभियान राज्यस्तर अभियानांतर्गत उमरी तालुक्यातील बळेगाव येथून मुदखेड शहरासाठी पाणी पुरवठा योजना कार्यान्वित करणे . मुदखेड नगरपरिषदेची हद्दवाढ करणे . शहरातील पाणी टंचाईबाबत आढावा . बौध्द स्मशानभूमी व इतर समाजाच्या स्मशान भूमीसाठी रस्त्यासाठी भूसंपादन करणे . कालेजी देवी ते रेल्वे उड्डाण पुलापर्यंत पाणंद रस्ता विकसित करणे . रेल्वे भुयारी पोच मार्ग चालु करण्यासाठी भूसंपादन मार्ग चालु कराभूसंपादन करणे . भोकर चौक ते न्याहाळीकडे जाणारा रस्ता जोडण्यासाठी रेल्वे उहाण पुलाचे बांधकाम करणे . नगरपरिषदेतील रिक्त पदे भरणे . प्रधानमंत्री आवास योजना राबविणे . एकात्मिक गृहनिर्माण व झोपडपट्टी विकास कार्यक्रमांतर्गत घरकुलाची थकीत देयके देणे . श्रीखंडोबा देवस्थानाचा तीर्थक्षेत्र विकास कार्यक्रमांतर्गत समावेश करणे . शहरात सांस्कृतिक सभागृह बांधकाम करणे . मील्लतनगर ते वसंतनगर तांडा ते उमरीरोडपर्यंत रस्त्याचे भूसंपादन करणे व रस्ता विकसित करणे यासह शहरातील विविध विकास कामांचा आढावाही श्री चव्हाण यांनी घेतला . मुदखेड शहरात चालू असलेली विकास कामे चांगली , दर्जेदार , पारदर्शकपणे तात्काळ पूर्ण करण्याचे आदेश देवून नवीन विकास कामांचे प्रस्ताव शासनास सादर करण्याबाबतही करावेत सूचनाही त्यांनी केली . कार्यक्रमाची प्रस्तावना मुदखेड नगरपरिषदेचे नगराध्यक्ष मुजीब अन्सारी यांनी केली . यावेळी माधव कदम यांनी मनोगत व्यक्त केले . कार्यक्रमासाठी लक्ष्मण देवदे , बालाजी गोडसे , शेख करीम शेख सादात , बंदे अलीखाँ पठाण , इम्रान मच्छीवाले , संजय आऊलवार , चांदु चमकुरे , चांदु बोकेफोड , उमाकांत घोंगडे , उत्तम चव्हाण , बबलु शेठ , रावसाहेब चौदंते , किशोर पारवेकर आदींची उपस्थिती होती . हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मुदखेड नगरपरिषद कर्मचारी रामेश्वर वाघमारे , अनंत कुलकर्णी , दिलीप पवार , मोहन कवळे , नितीन चव्हाण , पांडूरंग मोरे , म . यूनूस सैफुलहक , भीसे गंगाधर , रमेश सावंत , मोहन पांचाळ , गणेश वड्डे आदींनी परीश्रम घेतले .

0 comments:

Post a Comment