परभणी : सोनपेठ तालुक्यातील शेळगाव येथील सहा वर्षीय बालिकेवर लैंगिक अत्याचार करून तिचा निघून खुन करणाऱ्या नराधम विष्णु मदन गोरे यास गंगाखेड जिल्हा सत्र न्यायालयाचे न्यायधिश एस . जी . इनामदार यांनी फाशीची शिक्षा सुनावली आहे . बाल वयातच माता पित्याचे छत्र हरविलेला नातीचा सांभाळ आजोबा करीत होते . ससर्वांना तिचा लळा लागलेला होता , घरात सर्वाची ती आवडती होती . पण दि . २७ ऑक्टोंबर २०१६ रोजी ती घरा बाहेर खेळत असताना , अचानक बेपत्ता झाल्याने संपूर्ण कुंटुब हादरले . तिच्या शोधासाठी शेळगाव पिंजून काढला . राञ भर शोध सुरू होती , पण ती सापडलीच नाही . अखेर दि . २७ ऑक्टोंबर २०१६ रोजी आजोबा प्रभाकर शामराव गायवळ यांनी सोनपेठ पोलिस ठाण्यात आपल्या सहा वर्षीय नातीचे अपहरण केल्याची फिर्याद देण्यात आली . त्या अनुशगांने सोनपेठ पोलिसानी तपास सुरू केला आसता , या तपासात दोन दिवसात या बालिकेचा मृतदेह पोत्यात बांधलेल्या अवस्थेत विश्वाभंर लोढे यांच्या शेतातील विहीरीत आढळून आला . या घटनेने संपूर्ण कुंटुबावर दु : खाचा डोंगर कोसळला सदर प्रकरणी पोलिसानी वैद्यकीय अहवाला नुसार ३७६ अ व बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायदा अन्वये कलम ३ व ६ नुसार गुन्हात वाढ करण्यात आली .पोलिस पाटील अश्रोबा कुराडे व सुनील गोरे यांनी या घटनेतील मुख्य आरोपी विष्ण मदन गोरे अल्याचे कळताच त्यांनी सोनपेठ पोलिस स्टेशनला सांगितले पण सदरील आरोपी गावातुन फरार झाला आसता गन्हे अन्वेशषन विभागाचा मदतीने त्यास कर्नाटक येथून अटक करून आणले आसता , त्याने गुन्ह्याची कबुली दिली . गंगाखेड जिल्हा सत्र न्यायालयात या प्रकरणी दोषारोप पत्र दाखल करून या प्रकरणात एकुण २३ साक्षीदार तपासण्यात आले यात फिर्यादी साक्षीदार व वैद्यकिय अहवाल , घटनास्थळ , तपास पोलिस अधिकारी यांच्या साक्षी महत्वपूर्ण ठरल्या व आरोपी विरूद्ध गुन्हा सिद्ध झाला , यावरून न्यायाधीश एस . जी . इनामदार यांनी आरोपी विष्ण गोरे यास फाशीची शिक्षा सुनावली या प्रकरणात सरकारी पक्षातर्फे ऍड . एस डी वाकोडकर यांनी कामकाज पाहिले . त्यांना ऍड . डि . यु . दराडे , ऍड . एस . बी . पौळ , ऍड . एस . पी . चौधरी , ऍड . भगवान यादव यांनी सहकार्य केले . यावेळी बालिकेचा आजोबानी आरोपीस लवकरात लवकर फाशी द्यावी अशी भावना व्यक्त केली .
20 February 2020
Home »
» सहा वर्षीय बालिकेवर अत्याचार करणाऱ्या नराधमास फाशीची शिक्षा







0 comments:
Post a Comment