जशी आहे बातमी तसीच

एक्सप्रेस न्युज लाईव्ह च्या अधिक बातम्या पाहण्यासाठी आमच्या YouTube वरील EXPRESS NEWS LIVE च्या CHANNEL ला SUBSCRIBE करा आपल्या भागातील बातम्या पाठवा आमच्या ईमेल वर expressnewslive123@gmail.com बातमी वाचण्यासाठी http://livenews143.blogspot.com भेट द्या ... धन्यवाद WELCOME TO MY NEWS BLOG SUBSCRIBE MY YouTube CHANNEL"Express NEWS live"

13 February 2020

माझ्यामुळे सर्वांना त्रास मला गोळ्या झाडा ' हिंगणघाट जळीतकांडातील आरोपी विकेश नगराळेची मागणी ?

 वर्धा । हिंगणघाट येथील जळीतकांडातील पीडितेच्या मृत्यूनंतर राज्यभरातून संतप्त प्रतिक्रिया येत आहेत . या गुन्ह्यातील मुख्य आरोपी विकेश उर्फ विक्की नगराळे याला फासावर लटकवण्याची मागणी नागरिक करत आहेत . राज्य सरकारने देखील आरोपीला लवकरात लवकर शिक्षा देण्याचं आश्वासन दिलं . सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार आता स्वतः आरोपी विक्की नगराळे यानेही त्याला गोळ्या झाडून मारण्याची मागणी केली आहे ( Hinganghat accused demand to shoot ) . सुरुवातीला आरोपीला पीडितेच्या मृत्यूची माहिती नव्हती . मात्र ही माहिती मिळताच त्याने माझ्यामुळे सर्वांना त्रास होत असल्याचं म्हणत गोळ्या मारण्याची मागणी केली . लोकभावनेच्या दबावातून त्याने ही मागणी केल्याचं सांगितलं जात आहे . आरोपी विक्की नगराळेला सध्या वर्धा शहरातील जिल्हा कारागृहात ठेवण्यात आलं आहे . त्याला कारागहातील बॅरेक क्रमांक पाच मध्ये ठेवण्यात आलं आहे . आरोपीच्या सुरक्षेच्या दृष्टीने या बॅरेकमधील काही कैद्यांना स्थलांतरित करण्यात आलं . सुरवातीला या बॅरेकमध्ये 12 ते 15 कैदी होते . त्यानंतर या बॅरेकमध्ये केवळ 5 कैदी ठेवण्यात आले . यात सुरक्षेच्या दृष्टीने चांगलं वर्तन असणाऱ्या कैद्यांना । प्राधान्य देण्यात आलं . एका निवृत्त पोलीस निरीक्षकाचा देखील या कैद्यांमध्ये समावेश आहे . आरोपी विकेश ऊर्फ विक्की नगराळे 4 दिवस पोलीस कोठडीत , तर 4 दिवस वर्धा कारागृहात होता . यानंतर 20 फेब्रुवारीपर्यंत त्याला न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली . सुरक्षेच्या दृष्टीने आरोपीला दुसरीकडे स्थलांतरित करा , अशी मागणी वर्धा कारागृह प्रशासनाकडून करण्यात आली होती . दरम्यान या प्रकरणातील 5 साक्षीदारांची ओळख परेड हिंगणघाट येथील नायब तहसीलदारांच्या उपस्थितीत कारागृहात पार पडली . यावेळी 2 सरकारी पंच उपस्थित असल्याची सुत्रांनी माहिती दिली . तब्बल 1 तास ही ओळख परेडची प्रक्रिया चालली . यानंतर या आरोपीला कारागृहाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या आदेशाने नागपूर येथील कारागृहात हलवण्यात आलं आहे . सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार , पीडितेचा ज्या दिवशी मृत्यू झाला . त्या दिवशी कारागृहात असणाऱ्या आरोपीलला याची माहिती नव्हती . दुसऱ्या दिवशी मंगळवारी ( 11 जानेवारी ) आरोपी विक्की नगराळे याला ही माहिती मिळाली . यानंतर तो काही काळ निशब्ध होऊन कारागृहात उभा राहिला आणि नंतर बॅरेकमध्ये आपल्या पलंगावर बसला . मात्र काही वेळेनंतर त्याच्या चेहऱ्यावर घटनेबाबत कोणतेही दुःख दिसले नाही . मात्र , नियमित झडती दरम्यान आरोपीने माझ्यामुळे सर्वांना त्रास होतोय , असं म्हणत मला गोळी झाडून मारा , अशी मागणी केली . पोलीस कोठडीनंतर न्यायालयीन कोठडीत पोहचलेल्या आरोपीच्या सुरक्षेचा तणाव जिल्हा प्रशासन , कारागृह प्रशासन , पोलीस प्रशासन यांच्यावर दिसून येत होता . त्यामुळेच दिवसाला 5 आणि रात्रीला 3 पोलिसांचा तुरुंगाबाहेर खडा पहारा लावण्यात आला होता . शिवाय कारागृहासमोर तात्पुरती पोलीस चौकी आणि शहरातील पेट्रोलिंग वाढवण्यात आली होती .हिंगणघाटच्या घटनेनंतर आरोपीचा हैद्राबादसारखा गोळ्या झाडत एन्काउंटर करा अशीही मागणी केली जात आहे . दुसरीकडे मला गोळ्या झाडा अशी मागणी स्वतः आरोपीनेच कारागृहात केली . असं असलं तरी आरोपीची ही मागणी पश्चातापाच्या भावनेतून नाही तर आपल्या विरोधातील जनभावनेच्या दबावातून आल्याचंही बोललं जात आहे . सर्वच स्तरातून आरोपीला लवकरात लवकर शिक्षा देण्याची मागणी केली जात आहे . त्यामुळे न्यायलयीन प्रक्रिया पूर्ण होऊन आरोपीला शिक्षा कधी मिळणार हे पाहावे लागणार आहे .

0 comments:

Post a Comment