10 फेब्रुवारी - 2020 # नागपूर | हिंगणघाट येथील जळीत प्रकरणातील पीडित तरुणीची मृत्यूशी सुरू असलेली झुंज अपयशी ठरली आहे . सोमवारी पहाटे तिला हृदयविकाराचा धक्का आला . यानंतर तिची प्रकृती खालावली होती . यानंतर सकाळी सहा वाजून 55 मिनिटांनी तिने अखेरचा श्वास घेतला नागपुरमधील । ऑरेंज सिटी रुग्णालायात तिच्यावर उपचार सुरु होते . डॉ . राजेश अटव यांनी मेडिकल बुलेटिन जाही करत ही दुःखद बातमी सांगितली हृदयविकाराचा धक्का आल्यानंतर तरुणीला औषधे देऊन हृदयाचे ठोके आणि रक्तदाब वाढवण्याचा प्रयत्न करण्यात आल्याची माहिती डॉक्टरांकडून देण्यात आली रात्रभर तिला वाचवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले जात होते . मात्र संसर्गामळे रक्तपेशी रक्तातील ऑक्सिजनचं प्रमाण कमी झालं होते . याचा परिणाम तिच्या मेंदू , फुफ्फुसांवरही परिणाम झाला होता अशी माहिती डॉक्टरांनी दिली . पीडितेचं पार्थिव पोलिसांकडे लवकरच सुपूर्द केलं जाणार आहे . गेल्या आठ दिवसांपासून ती मृत्यूशी झुंज देत होती . सोमवारी सकाळी नागपुरच्या ऑरेंज सिटी रुग्णालयात तिने _ _ अखेरचा श्वास घेतला . विकी नगराळे या तरुणाने तिच्यावर पेट्रोल टाकून तिला जिवंत जाळण्याचा प्रयत्न केला होता.3 फेब्रुवारी रोजी साडे सात वाजता ही तरुणी लगबगीने महाविद्यालयाकडे निघाली होती . या 24 वर्षीय प्राध्यापिकेच्या अंगावर पेट्रोल ओतून एका नराधमाने भररस्त्यात पेटवून दिले . वर्धा जिल्ह्यातील हिंगणघाट येथे ही संतापजनक घटना घडली . तरुणीला पेटवल्याचे पाहताच काही शाळकरी मुलींनी आरडाओरड करत जवळपासच्या मदतीची याचना केली . त्या वेळी धावत येऊन नागरिकांनी तत्काळ तरुणीच्या अंगावर पाणी ओतून आग विझवली . या घटनेमध्ये ही तरुणी 40 टक्के भाजली होती . नागपुरातील ऑरेंज सिटी रुग्णालयात ती मृत्यूशी झुंज देत होती .
10 February 2020
Home »
» हिंगणघाट जळीत प्रकरणातील तरुणीची अखेर मृत्यूशी झुंज संपली . नागपुरातील ऑरेंज सिटी रुग्णालयात सकाळी घेतला अखेरचा श्वास







0 comments:
Post a Comment