# नांदेड 27 फेब्रु । लोहा तालुक्यातील सोनखेड येथील पाच वर्षीय चिमुकलीवर अत्याचार करणा ? या नराधमास पोलिसांनी अखेर अटक केली आहे सोनखेड येथील पाच वर्षे चिमुकलीचे अपहरण करून तिच्यावर अत्याचार केल्याची घटना गेल्या दोन दिवसापूर्वी उघड झाली या घटनेनंतर पुन्हा एकदा जिल्हा हादरला . महिला व मुलींवर होणाऱ्या अत्याचाराच्या घटना थांबता थांबत नसल्याचे समोर आले असून सोनखेड येथील अत्याचारी नराधमाच्या मुसक्या आवळण्यासाठी विविध राजकीय पक्ष आणि सामाजिक संघटनांकडून आंदोलन पुकारण्यात आले होते . या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेत पोलीस अधीक्षक विजयकुमार मगर यांनी ग्रामीण चे उपविभागीय पोलिस अधिकारी आणि स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला आरोपीला अटक करण्याचे निर्देश दिले . स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने सोनखेड पोलिसांच्या माध्यमातून नराधम सुग्रीव उर्फ बाबुराव भुजंगराव मोरे ( वय 28 वर्षे राहणार महादेव गल्ली सोनखेड ) याच्या मुसक्या आवळल्या बालिकेच्या शोषण करणा ? या नराधमास । फासावर लटकवा अशी मागणी करण्यात आली आहे . या अत्याचाराच्या घटनेविरुद्ध गेल्या दोन दिवसापासून सोनखेड ची बाजारपेठ पूर्णतः बंद ठेवण्यात आली होती तर नांदेड शहरातील सिडको - हडको परिसरातही आज बंद पुकारण्यात आला होता .
28 February 2020
Home »
» सोनखेड बालिका अत्याचार प्रकरणातील नराधम अखेर पोलिसांच्या जाळ्यात







0 comments:
Post a Comment