जशी आहे बातमी तसीच

एक्सप्रेस न्युज लाईव्ह च्या अधिक बातम्या पाहण्यासाठी आमच्या YouTube वरील EXPRESS NEWS LIVE च्या CHANNEL ला SUBSCRIBE करा आपल्या भागातील बातम्या पाठवा आमच्या ईमेल वर expressnewslive123@gmail.com बातमी वाचण्यासाठी http://livenews143.blogspot.com भेट द्या ... धन्यवाद WELCOME TO MY NEWS BLOG SUBSCRIBE MY YouTube CHANNEL"Express NEWS live"

04 February 2020

अल्पवयीन बालिकांवर अत्याचार करणारा शिक्षक पोलीस कोठडीत

नांदेड | अल्पवयीन बालिकांसोबत अश्लिल चाळे करणाऱ्या 30 वर्षीय शिक्षकाला विशेष न्यायाधीश एन . डी . खोसे यांनी 7 फेबुवारीपर्यंत पोलीस कोठडीत पाठविले आहे .विमानतळ पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एका शाळेत अनेक पालक जमले . त्यांनी या शाळेतील शिक्षक स्वप्नील भिमराव श्रृंगारे ( 30 ) रा . गंगानगर सांगवी हा आमच्या 9 वर्ष वयाच्या बालिकांसोबत शाळेतच रिक्याम्या वर्गात अश्लिल चाळे करतो अशी तक्रार दिली . या तक्रारीवरुन विमानतळ पोलीसांनी गुन्हा क्रमांक 40 / 2020 दाखल केला . त्यात भारतीय दंडविधानाची कलमे 376 ( 2 ) ( एफ ) ( एन ) ( 3 ) , 354 , 354 ( ब ) , 5063 आणि बालकांचे लैंगिक अत्याचारापासून संरक्षण अधिनियम सुधारीत 2012 च्या कलम 4 , 6 , 8 , 10 , 12 , 18 जोडली . काल दि . 2 फेबुवारी रोजी स्वप्नील भिमराव श्रृंगारे या शिक्षकाला अटक झाली होत . या गुन्ह्याचा तपास पोलीस उपअधिक्षक पोलीस उपनिरिक्षक आरती पोवार यांच्याकडे देण्यात आला . आज 3 फेबुवारी रोजी पोलीस उपनिरिक्षक आरती पोवार , ए . जी . लांडगे , पोलीस कर्मचारी अरुण राठोड आणि गंगावरे यांनी स्वप्नील श्रृंगारेला विशेष न्यायालयात हजर केले . न्यायालयात सहायक सरकारी वकील ऍड . रणजित देशमुख यांनी या प्रकरणातील गांभीर्य न्यायालयासमक्ष मांडले आणि पोलीस कोठडी देण्याची विनंती केली . युक्तीवाद ऐकून न्यायाधीश एन . डी . खोसे अत्यंत निरागस बालिकांसोबत अश्लिल चाळे करणाऱ्या शिक्षक स्वप्नील श्रृंगारेला 7 फेबुवारी पर्यंत पोलीस कोठडीत पाठविले आहे .

0 comments:

Post a Comment