जशी आहे बातमी तसीच

एक्सप्रेस न्युज लाईव्ह च्या अधिक बातम्या पाहण्यासाठी आमच्या YouTube वरील EXPRESS NEWS LIVE च्या CHANNEL ला SUBSCRIBE करा आपल्या भागातील बातम्या पाठवा आमच्या ईमेल वर expressnewslive123@gmail.com बातमी वाचण्यासाठी http://livenews143.blogspot.com भेट द्या ... धन्यवाद WELCOME TO MY NEWS BLOG SUBSCRIBE MY YouTube CHANNEL"Express NEWS live"

22 February 2020

भल्या पहाटे रेतीने भरलेल्या टिपरच्या धडकेत शाळकरी विद्यार्थ्यांचा जागीच मृत्यू

 नरसीफाटा | रेतीने भरलेल्या टिप्परने एका दुचाकीला जोरदार धडक दिली . यात दुचाकीवरी शाळकरी विद्यार्थ्यांचा जागीच मृत्यू झाला . सदरील घटना दि . 22 फेब्रुवार रोजी शनिवारी सकाळी 7 : वाजताच्या सुमारास नायगाव तालुक्यातील ईकळीमाळजवळील शिवारात घडीला . अपघात एवढा भिषण होता की रेती भरुन आलेला टिपर इतके भरधाव वेगाने होते की मोटरसायकल वरील शाळकरी विद्यार्थ्यांना जवळपास चाळीस फुट कडसडत पळून जाण्याचा प्रयत्न केला परंतु मोटरसायकल टिपरच्या दोन्ही चाकात अडकल्याने पळून जाता आले व यात शाळकरी विद्यार्थ्यांचे अक्षरशः आतडे बाहेर पडल्यामुळे सुरजचा जागीच मृत्यू झाला . ईकळीमाळ ता . नायगाव येथील आजोबा आणि नातु हे दोघेजण एम . एच . 12 इ . सी . 8501 या क्रमांकाच्या मोटारसायकलवरुन आपल्या शेताकडे पाखरं हाकारण्यासाठी जात असताना पाठीमागुन रेती भरुन भरधाव वेगाने येणारा टिपर क्रमांक एमएच 04 इ . एल 9666 हा ओहरटेक करीत असताना मोटरसायकल वर जोराने धडकला या भिषण अपघातात मोटरसायकलवरील सुरज राजाराम बोडके रा . एकलारा ता मुखेड ह्या शाळकरी विद्यार्थ्यांला टिपरने चाळीस फुट खडसड नेल्याने पोटातील आतडे बाहेर पडले आणि त्यांचा जागीच मृत्यू झाला . या अपघातात आजोबा नागोराव खंडु सुर्यवंशी रा . ईकळीमाळ ता . नायगाव यांच्या पायाला गंभीर दुखापत झाली असून त्यांच्यावर कुंटुर येथे उपचार सुरू आहेत .या अपघातानंतर टिपर चालक फरार झाला असून सदरील टिपर मालकावर बड्यांचा आशिर्वाद असल्यामुळे अशा प्रकरण घडत राहतात त्यांची भिती वाटत नाही अशी चर्चा सुरू आहे . या घटनेची माहिती होताच कुंटुर पोलीसांनी घटनास्थळी जावुन परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी प्रयत्न केला परंतु नातेवाईकांनी त्यांना न जुमानता टिपर मालक व ड्रायव्हरला जो पर्यंत अटक करणार नाही तो पर्यंत युवकाचे मृतदेह जागेवरून उचलु देणार नाही असे म्हणत तब्बल सात तास युवकाचा मृतदेह जागेवरून उचलु दिले नाही . नायगावच्या तहसीलदार सुरेखा नांदे यांनी घटनास्थळाला भेट देऊन नातेवाईकांना समज घातले परंतु नातेवाईक त्यांचे म्हणणे ऐकायला तयार नव्हते . कुंटुर परिसरातील बळेगाव , धनंज , मेळगाव , हुससा , राहेर अदि गावातील रेती व मातीचे रात्रन दिवस अवैद्य मार्गाने यवसाय जोरदार सुरू आहे . रात्रभर दिवसभर रेतीने भरलेले टिपर हायवा भरधाव वेगाने वाहने चालवत आहेत . सदरील रेती वाहतूक टिपरचा कुंटुर सर्कलच्या गावातील नागरिकांना मोठ्या त्रासदायक ठरू लागला आहे . उमरी तालुक्यातुन दररोज पहाटे रेतीने भरलेली टिपर भरधाव वेगाने ईकळीमाळ मार्गे जात असताना कुंटुर पोलिस व महसूलचे मंडळ अधिकारी व तलाठी बघ्याची भुमिका घेतआहेत . सदरील रिती माफीयाला भल्या पहाटेची रॅयलटिची परवानगी आहे का नाही हे पाहण्यासाठी एकही महसूलचा आधिकारी राहातं नाही यांना आशिर्वाद कोणाचा ? 

0 comments:

Post a Comment